निवडबार्शीमहाराष्ट्र

उपळे दुमालाच्या कन्येची घवघवीत कामगिरी; राजश्री शिवाजी भोसले यांची कर निर्धारण अधिकारी पदावर निवड

B1 न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला गावची कन्या राजश्री शिवाजी भोसले यांनी महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षेत घवघवीत यश संपादन करत कर निर्धारण अधिकारी पदावर निवड मिळवली आहे. या यशामुळे उपळे दुमाला गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून गावात आनंदाचे वातावरण आहे.

राजश्री भोसले यांनी बार्शी येथील शिवाजी महाविद्यालयातून बी.एस्सी. पदवी पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्धार केला. सन २०२०-२१ मध्ये पुणे येथील युनिक अकॅडमीमध्ये एक वर्ष मार्गदर्शन घेतल्यानंतर त्यांनी पुण्यात राहून स्वअभ्यासाच्या जोरावर सातत्याने मेहनत घेतली.500त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ म्हणून महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा (गट-क) २०२३-२४ परीक्षेत २०० पैकी तब्बल १७६ गुण मिळवत त्यांनी कर निर्धारण अधिकारी पदावर यशस्वी निवड मिळवली.

राजश्री या उपळे दुमाला येथील शिक्षक शिवाजी पोपट भोसले यांच्या कन्या आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल समस्त ग्रामस्थ, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच भोसले परिवाराकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून पुढील शासकीय सेवेसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

राजश्री भोसले यांच्या यशामुळे बार्शी तालुक्याचे व उपळे दुमाला गावाचे नाव राज्यभर उज्ज्वल झाले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी त्यांनी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button