चंद्रकांत (पट्टम) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना मोफत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ व सिद्धेश्वर मंदिर दर्शन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : चंद्रकांत पट्टम पवार यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त महिलांना श्रावण महिन्याचे अवचित्य साधून अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ व सोलापूर येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांचे दर्शनाची मोफत सोय चंद्रकांत पवार मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आली होती यापूर्वी देखील मित्र मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले आहेत.
यावेळी महिलांनी चंद्रकांत पवार यांना औक्षण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित चंद्रकांत पवार निलेश पवार माधुरी पवार कविता शिंदे राणीताई फासे सुवर्णा राऊत राम शिंदे प्रविण पवार बजरंग पवार सचिन गोडगे हनुमंत पवार उमेश कानडे दादा चव्हाण व वाहक राहुल चौधरी उपस्थित होते.




