बार्शीसामाजिक

रक्तदान , मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे बार्शी येथे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क

महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य

बार्शी : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन याचे औचित्य साधून बार्शी येथे 28 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन बार्शी येथे सुविधा हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आले आहे. हे शिबिर सुविधा हॉस्पिटल , सावता परिषद, महात्मा फुले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य औषधोपचार सुद्धा करण्यात येणार आहेत. या शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर म्हणून डॉक्टर अजित आव्हाड कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई , डॉक्टर सुयोग बुरगुटे, डॉ. सारंग बुरगुटे यांचे मार्गदर्शन व तपासणी लाभणार आहे. या शिबिरामध्ये पोलिस व पत्रकार यांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष कक्ष ठेवण्यात आला आहे, तरी बार्शी व परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सावता परिषद सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष नितीन भोसले व तालुका अध्यक्ष दिनेश नाळे यांनी केले आहे. यावेळी एडवोकेट वासुदेव ढगे , शीतल नाळे , माऊली नाळे, दादा शिंदे, कुमार माळी, जिल्हा संघटक उमेश नायकुडे, अशोक माळी युवक अध्यक्ष सावता परिषद बार्शी,लक्ष्मण माळी युवक उपअध्यक्ष बार्शी,कल्याण जांभळे कार्याध्यक्ष सावता परिषद बार्शी,नागनाथ म्हेत्रे शहराध्यक्ष बार्शी, महेश माळी वैराग विभागाध्यक्ष बाबासाहेब माळी , वैराग विभाग संघटक अभिमान ढगे तात्या शिर्क, आप्पा माळी, राजेश कोल्हे राऊत सर, आबा राऊत, विजय खारवणे उपाध्यक्ष तालुका अजय शिंदे , विजय माळी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button