महाराष्ट्रसत्कारसोलापूर

पालकांनो मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा मुलांच्या संस्कारासाठी वेळ द्या – वक्ते प्रा. संजय कळमकर

विठ्ठलवाडीचे मुख्याध्यापक अनिलकुमार बरकडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

माढा : आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या व मोबाईलच्या युगात पालकांनी मोबाईलवर अधिक वेळ घालविण्यापेक्षा मुलांच्या संस्कारासाठी वेळ द्यावा. मुलांच्या हातात महागडे मोबाईल देण्यापेक्षा चांगली दर्जेदार वाचनीय पुस्तके द्यावीत.आजची पिढी नुसती शिक्षित असून उपयोग नाही तर ती सुसंस्कारित घडविण्यासाठी शिक्षक व पालकांनी मनापासून प्रयत्न करावेत.मुले बाहेर कोणासोबत वेळ घालवितात आणि कोणते छंद जोपासतात याबाबत पालकांनी नेहमी जागरूक राहणे आवश्यक आहे.कुटुंबामध्ये सुसंवाद असला पाहिजे.सर्वांनी सकारात्मक विचारधारा व आनंदी वृत्तीने जगण्यासाठी विशेष प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन अहिल्यानगरचे प्रसिद्ध वक्ते प्रा.संजय कळमकर यांनी केले.

ते माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे रहिवासी व केवड येथील श्री भैरवनाथ प्रशालेचे मुख्याध्यापक अनिलकुमार बरकडे यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या वेळी 15 मे रोजी बोलत होते.5000अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी अनिल काका देशमुख होते. प्रास्ताविक विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिलकुमार बरकडे यांचा सपत्नीक सत्कार संस्था, भैरवनाथ प्रशाला, विठ्ठलवाडी पतसंस्था, वाचनालय, माध्यमिक विद्यालय, ग्रामस्थ, मित्रमंडळी व नातेवाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

अध्यक्षस्थानावरून कृषी अधिकारी अनिल देशमुख यांनी सांगितले की, अनिलकुमार बरकडे यांनी इंग्रजी विषयाचे अध्यापन सहजसोप्या पद्धतीने केल्याने ते एक विद्यार्थीप्रिय शिक्षक बनले होते. त्यांनी शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. तोच वारसा त्यांनी सेवानिवृत्तीनंतरही सुरू ठेवावा. कुटुंब,नातेवाईक व मित्रमंडळींच्या सहवासात जीवन आनंदाने जीवन जगावे असे आवाहन केले.

सत्काराला उत्तर देताना अनिलकुमार बरकडे म्हणाले की, माझे कुटुंबीय,सहकारी शिक्षक व काही चांगल्या मित्रमंडळींच्या सहकार्यामुळे माझी शैक्षणिक सेवा यशस्वीपणे पूर्ण झाली. विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून मनोभावे सेवा केली.आज अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत याचा मनस्वी आनंद होत आहे. कोणतेही काम झोकून देऊन उत्कृष्ट पद्धतीने केले तरच आत्मिक समाधान लाभते असे त्यांनी सांगितले.500सूत्रसंचालन करून आभार आदर्श शिक्षक गोरखनाथ शेगर यांनी मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजय करंडे,सचिव रामचंद्र आवारे,चेअरमन अनिलकुमार अनभुले, आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, दत्तात्रय चवरे, दत्तात्रय बरकडे, ॲड. सुरेश पाटील, हनुमंत उबाळे, बालाजी गव्हाणे, प्रा.अरुण कदम, प्रा. कुंडलिक गुंड, प्रा.पंडित लावंड, सुनील शेंडगे, नेताजी कदम, धनाजी सस्ते, रमेश जाधव, सारिका करंडे, बापूसाहेब नेमाणे, रामचंद्र करंडे, दीपक पाटील, सरपंच मोनिका खरात, कुसुम बरकडे, स्मिता बरकडे, मेघना गुंड, डॉ. स्वरांजली बरकडे, राजेंद्र पाटील, उपसरपंच नितीन पाडूळे, पो.कॉ. सचिन बंडगर, संतोष बंडगर, प्रा.डॉ.नेताजी कोकाटे, महमदहनिफ मुंढे, अनिल क्षीरसागर, ॲड.नवनाथ तांबिले, मुख्याध्यापक अमोल चव्हाण, ज्ञानेश्वर मस्के, अमोल लटके, मधुकर बरकडे, महावीर बरकडे, उपलेखापरीक्षक सुहास शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक बिरुदेव खांडेकर, संजय जाधव, राजाभाऊ कदम, सौदागर गव्हाणे, नेताजी उबाळे, सुशेन भांगे, दिपक गव्हाणे, सोमनाथ खरात, सुधीर गुंड, राजेश बरकडे, भिवाजी जाधव, किशोर गुंड, सज्जन मुळे, दिनेश गुंड, सौदागर खरात, समाधान कोकाटे, ब्रम्हदेव शिंगाडे, शिवाजी जाधव, सत्यवान शिंगाडे, भिमराव नागटिळक, रामभाऊ कदम, बबलू नागटिळक, निखिल शेंडगे, संदीप सस्ते, अभिषेक बरकडे, महादेव बरकडे, पांडुरंग बरकडे, रमेश बरकडे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक,युवक, मित्रमंडळी व नातेवाईक उपस्थित होते.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button