बार्शी

विविध मागण्यांसाठी घाणेगावकरांचे रस्ता रोको आंदोलन

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : विविध मागण्यांसाठी घाणेगाव करांचे रस्ता रोको आंदोलन या वेळी बोलताना संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष आनंद काशीद म्हणाले घाणेगाव हे गाव महाराष्ट्रात आहे की नाही ही शंका या गावाला मुख्य मार्गा वरून गावाकडे जाताना येते. कारण रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही, गावातील तरूण स्वावलंबी होण्यासाठी धडपडत आहेत. पण त्यांना उद्योगासाठी कर्ज मिळत नाही. शेतकर्यांना पिक कर्ज देण्यास टाळाटाळ होते, त्या मुळे गावात बे रोजगारांची संख्या अधीक आहे त्या साठी गावातील तरूणांना व शेतकर्यांना घाणेगाव दत्तक आसलेल्या बॅंके कडून मागेल त्याला कर्ज पुरवठा करावा. वृद्ध व्यक्ती , विधवा महिलांना विविध योजनांचा लाभ तहसील कार्यालया कडून पुढाकार घेऊन द्यावे. शेतकर्यांना विज योग्य दाबाने मिळावी या साठी आम्ही महावितरण ला हव ते सहकार्य करू पण घाणेगाव साठी स्वतंत्र फिडर बसवावे. त्याच बरोबर गावातील जनावरे पाणी पाजण्यासाठी पिराच्या तळ्यावर वाट करून द्यावी या सर्व मागण्या लवकर पुर्ण करा अन्यथा या पुढे उग्र आंदोलन करू, होणार्या परिणामास संबंधीत विभागाचे अधिकारी जबाबदार असतील आसे मनोगत व्यक्त केले.
तर गावचे प्रमुख नागरीक रंजीत पाटील बोलताना म्हणाले की आम्ही नेहमी प्रशासनाला सहकार्य करत आलो आहोत पण काही अधिकारी जानून बुजून आमच्या गावाकडे दुर्लक्ष करीत आहेत म्हणून गाव मागे रहात आहे या मागण्या पूर्ण कराव्यात गावकर्यांचा संयमाचा अंत पाहू नये. त्याच बरोबर संतोष टकले यांनी आम्ही मागील एक वर्षापासून जनावरांना पाणी पिण्यासाठी तळ्यावर वाट मागतोय ती द्यावी अन्यथा या पुढे रस्ता रोको जनावारासहीत करू आसे आवाहन दिले…
या आंदोलनाला मोठी गर्दी होती. या वेळी संदीप शिंदे, अल्ताब मुलाणी, समाधान पाडूळे, संदीप बचुटे, प्रशांत स्वामी, विजय लोंढे, प्रमोद पाटील, सोमनाथ गिरी, शहाजी बचुटे, आण्णा शिंदे, सुग्रीव नेटके, सचिन कुलकर्णी यांच्या सह अनेक गावकरी होते.यावेळी निवेदन मेकाले सुर्डी सर्कल यांना दिले व सर्व विभागाच्या अधिकार्यांशी लवकरच मिटींग लावतो आसे आश्वासन दिले, तर वैराग पोलीस स्टेशनचे एएसआय देशमुख पोलीस हवालदार परबत व यावलकर पोलीस नाईक नागेश नाईकनवरे पोलीस नाईक सचिन मुंडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button