पंढरपूरमहाराष्ट्रयोजनासोलापूर

संवाद वारी’ उपक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट; योजनांची घेतली माहिती

‘सर्वसामान्य नागरिक, भाविक व वारकऱ्यांना योजनांची माहिती मिळेल’ – जिल्हाधिकारी कार्तिकेयन

B1न्यूज मराठी नेटवर्क500

पंढरपूर, दि. २० : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत सुरू असलेल्या ‘संवाद वारी’ या शासकीय योजनांच्या प्रचार-प्रसार उपक्रमाला सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आज भेट दिली.

अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयासमोर माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी प्रदर्शनातील पॅनेल, एलईडी व्हॅन व चित्ररथाची पाहणी करून विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली.500यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, “हा उपक्रम चांगला असून यातून सर्वसामान्य नागरिक, भाविक व वारकऱ्यांना शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सहजपणे मिळेल. वारीच्या निमित्ताने लाखो लोक एकत्र येतात, त्यामुळे योजनांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी हे योग्य व्यासपीठ आहे.”500‘संवाद वारी’च्या माध्यमातून कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, रोजगार, गृहनिर्माण आदी विभागांच्या योजनांची माहिती पथनाट्य व एलईडीद्वारे देण्यात येत आहे. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी संवाद वारी हे प्रदर्शन नागरिकांसाठी भरवण्यात येत आहे. तरी या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button