कोल्हापूरमहाराष्ट्र

अनुसुचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहात विनामूल्य प्रवेश सुरु

B1न्यूज मराठी नेटवर्क

कोल्हापूर : सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर कार्यालयाच्या अधिनस्त जिल्ह्यात मुलां-मुलींची 18 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत.मुलां-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये अनु.जाती, अनु.जमाती विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गामधील शालेय विद्यार्थी व इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायीक अभ्यासक्रम वगळुन), सन 2025-26 मधील प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना दोन गणवेश, शैक्षणिक साहित्य, सकाळचा नाष्टा, दोन्ही वेळेच्या भोजनाची व राहण्याची सोय, ग्रंथालय, मासिक दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्ता, सहल भत्ता, इत्यादी प्रकारच्या सोयी विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त इमारत, मनोरंजन कक्ष, अद्यावत जिम, वायफाय सुविधा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, आंघोळीसाठी गरम पाण्याचे सोलर सिस्टीम, सुरक्षा रक्षक व सफाईगार इत्यादी प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध आहेत.

सन 2025-26 या वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन असुन http:/hmas.mahalt.org पोर्टलवर अर्ज स्विकारण्यात येतील. गरजू विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह संबंधित वसतिगृहाच्या अधीक्षकांकडे अर्ज भरुन सादर करावेत. शालेय विद्यार्थ्यांकरीता वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचा अंतिम दि. 17 जुलै 2025 असुन इ. 11 वी व 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. 23 जुलै 2025 पर्यंत आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिध्द केले जाईल.

इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल आणि सहायक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर विचारे माळ, बाबर हॉस्पीटल जवळ, कोल्हापूर येथे समक्ष किंवा दूरध्वनी क्र.0231-2651318 वर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button