बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बी पी सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी , येथील आय.क्यू. ए. सी., एन.एस.एस. व शारीरिक शिक्षण विभाग द्वारा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात पार पडला. महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागामधील बी कॉम, एम. कॉम., बी. सी. ए. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रशिक्षणार्थी तसेच सर्व विभागाचे प्राध्यापक व महाविद्यालयाचे कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एस बी करंडे तसेच शारीरिक शिक्षण संचालक प्रा. आर एस डिसले महाविद्यालयाचे आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. डॉ. बी डी लांडे, ग्रंथपाल सौ ज्योती यादव,कॉमर्स विभागाचे विभाग प्रमुख प्रा. के बी चपटे, बी. सी. ए. विभागाचे विभाग प्रमुख प्रा. बी व्ही लिंगे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. ए. ढगे, प्रा. के. एम. माळी तसेच ज्युनियर विभागाचे समन्वयक प्रा. एच. डी. काळे हे उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा. आर. एस. डिसले यांनी केले. योग मार्गदर्शक पंकज रणदिवे व कुमारी दीप्ती ठोगें यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष मंत्रालयाच्या चौकटीत योगाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. समारोपात प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एस. बी. करंडे यांनी नियमित योगाचे दैनंदिन जीवनातील योग सरावाचे महत्त्व सांगितले. सध्या मानवी जीवनातील ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी नियमित योगा व प्राणायाम करण्याचे आवाहन केले. आभार ज्युनियर विभागाच्या शारीरिक संचालिका सौ आर आर शिंदे यांनी केले. सूत्र संचालन डॉ. एम. ए. ढगे यांनी केले.



