महाराष्ट्रसोलापूर

शासनाच्या ३०० कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत हिरज येथे वृक्षारोपण ‘एक पेड मॉं के नाम’ संकल्पासह विद्यार्थी, अधिकारी व शेतकऱ्यांचा सहभाग

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर, दि. २३ : शासनाच्या ३०० कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत दिनांक २२ जुलै २०२६ रोजी जिल्हा रेशीम कार्यालय, हिरज, ता. उत्तर सोलापूर येथे विविध वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली.

या वृक्षारोपण कार्यक्रमास सिंहगड विद्यापीठ, सोलापूरचे प्राचार्य एस. एस. पवार, सामाजिक वनीकरण विभागाच्या वनअधिकारी श्रीमती शुभांगी जावळे, कृषी विज्ञान केंद्राचे प्राचार्य डॉ. तांबडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अतुल राजपूत, अधिकारी व कर्मचारी, डॉ. चंद्रकांत ऐवळे, वैद्यकीय अधिकारी उत्तर सोलापूर डॉ. प्रीतम मुंदडा, योगेश्वर विद्यालय, हिरज येथील मुख्याध्यापक श्रीमती चवरे, शिक्षक व कर्मचारीवर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते.500यावेळी जिल्ह्यातील प्रगतशील रेशीम उद्योजक शेतकरी सौदागर पांडव, रेशीम विकास अधिकारी व्ही. एस. पवार, जिल्हा रेशीम कार्यालय, सोलापूर तसेच बाळासाहेब सूर्यवंशी, क्षेत्रीय अधिकारी, रेशीम कार्यालय, सोलापूर, महादेव गवंड आणि परिसरातील पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.500सदर कार्यक्रमात प्राचार्य एस. एस. पवार तसेच कृषी विज्ञान केंद्राचे प्राचार्य डॉ. तांबडे यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व व पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. उपस्थितांनी तसेच विद्यार्थ्यांनी ‘एक पेड मॉं के नाम’ हा पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घेतला, अशी माहिती रेशीम विकास अधिकारी, सोलापूर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button