गुळपोळी येथे श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे भव्य रक्तदान शिबिर; ९१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

B1 न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सामाजिक बांधिलकी जपत गुळपोळी (ता. बार्शी) येथील श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गावातील तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. शिबिरात तब्बल ९१ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.
या रक्तदान शिबिराचे हे सलग १६ वे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपक्रम यशस्वी केला. रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच रामहरी काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरासाठी श्रीरामभाई शहा रक्तपेढी, बार्शी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रक्तसंकलनाची संपूर्ण प्रक्रिया रक्तपेढीच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.
यावेळी शिरीष चिकणे, आण्णासाहेब चिकणे, कृष्णा मचाले, समाधान (बापू) म्हेत्रे, धनाजी मचाले, गणेश लंगोटे, लक्ष्मण काळे, राहुल मचाले, कृष्णा चिकणे, योगेश चिकणे, धनाजी चिकणे, दत्तात्रय काळे, दत्तात्रय चिकणे , प्रविण बारवकर, ज्योतिराम शिंदे, रमेश शिंदे आणि सोमनाथ चिकणे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील युवकांनी सामाजिक कार्याची परंपरा कायम राखत रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याबद्दल सर्व स्तरातून मंडळाचे कौतुक करण्यात आले.



