आंदोलननिवेदनबार्शीमहाराष्ट्र

सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ आंदोलन व सरकारच्या दडपशाहीचा बार्शीत निषेध.

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : दिल्ली येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक व कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पाठिंबा देऊन सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला.

यावेळी वंचित आघाडीचे अ‍ॅड. विवेक गजशिव यांनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देऊन, सोनम वांगचूक यांचे शांततापूर्ण आंदोलन दिल्ली पोलिसांनी भाजप सरकारच्या सांगण्यावरून चिरडले असल्याचे सांगून अभिजीत दिपकेला केलेल्या महाराणीचा निषेध केला. तसेच २० जुलैच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देऊन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 500यावेळी वंचितचे शहराध्यक्ष धनंजय जगदाळे, काँग्रेस अल्पसंख्याचे अध्यक्ष वसीम पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश चव्हाण, बहुजन क्रांती मोर्चा सोलापूर कार्याध्यक्ष तानाजी बोकेफोडे, बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सचिन पालके,अ‍ॅड. हर्षवर्धन बोधले, भारिपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कदम,मोहन कसबे, प्रवीण आखाडे,सामाजिक कार्यकर्ते शरद बनसोडे यांनी मनोगत व्यक्त करून नायब तहसीलदार बोधे यांच्याकडे दिल्लीतील आंदोलनास पाठिंबा देऊन सरकारचा निषेध करीत असलेबाबतचे निवेदन दिले.500यावेळी वंचितच्या शहराध्यक्ष रेखा सरवदे, अंजली धांडोरे, उद्योजक तुषार बोकेफोडे, युवकचे शहराध्यक्ष स्वप्नील लंकेश्वर, शहर उपाध्यक्ष किरण भालशंकर, युन्नूस शेख,अ‍ॅड. मिलिंद बनसोडे, पांडा समींदर, भैय्या उबाळे, उत्तम चौधरी, बाबासाहेब खडसरे, अक्षय गायकवाड, राजेंद्र कदम, किशोर ढोले, सचिन ननवरे, अतिश बनसोडे, दिनेश दंदाडे, प्रशांत जाधव, दत्ता काकडे, ईश्वर पाचकूडवे आदी उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button