भूखंड विकासाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक झाल्यास कठोर कारवाई – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0

पोलीस आयुक्त कार्यालयात कायदा व सुरक्षा नियोजनाचा आढावा – सिसिटिव्ही यंत्रणा होणार सुधारणा

B1न्यूज मराठी नेटवर्क500

नागपूर : लॅड डेव्हलपमेंट अर्थात भूखंड विकासाच्या नावाखाली कोणत्याही नागरिकाची फसवणूक होऊ नये यासाठी जे दोषी आढळतील त्यांच्याबाबत कोणतेही हयगय केली जाणार नाही. शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक कुटुंबातील मुले ही नोकरीनिमित्त विदेशात व परगावी आहेत. येथे जे ज्येष्ठ नागरिक आहेत अशा पालकांची दिशाभूल करुन त्यांच्या राहत्या जागेबाबत जर कोणी बळजबरी करत असेल तर अशा पालकांनी नजीकच्या पोलीसांशी थेट संपर्क साधावा असे आवाहन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. पोलीस विभागानेही अशा प्रकरणात सुमोटो कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार डॉ. राजीव पोतदार, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त राजेद्र दाभाडे, विनीता साहू, वसंत परदेशी, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलीस उपायुक्त आदित्य मिलखेरकर, राहूल माकणीकर, संदीप पखाले, राहूल मदने, ऋषीकेश रेड्डी, अन्नपूर्णा सिंग, रश्मिता राव, नित्यानंद झा, रमेश धुमाळ व अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागपूर शहराच्या सुरक्षितेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची कमतरता पडू नये यासाठी प्रशासन दक्ष आहे. जिल्हा वार्षिक योजनेतूनही अधिकाधिक निधी आपण उपलब्ध करुन देत आहोत. याचबरोबर महानगरपालिकेअंतर्गत सिसिटिव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा अधिक सशक्त केली जात आहे. ग्रामीण व शहरी भागासाठी ही यंत्रणा अधिक एकीकृतपणे राबविण्यासाठी आवश्यकती यंत्रसामुग्री उपलब्ध करुन दिली जाईल, असे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.500नागपूर ग्रामीण आणि नागपूर शहर अशी व्यवस्था असलेल्या सिसिटिव्ही कॅमेरांचे एक संयुक्त केंद्र निर्माण करण्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीत मान्यता दिली. सद्यस्थितीत नागपूर येथील सुरक्षिततेच्या दृष्टीने जे कॅमेरे कार्यरत आहेत त्यांचे अपग्रेडेशन करुन ज्या-ज्या ठिकाणी व्यत्यय आहे तो दूर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ग्रामीण भागातील सिसिटिव्ही प्रकल्प अधिवेशनापूर्वी पूर्ण करुन शहरातील प्रकल्प हा तांत्रीकद्ष्टया एकाच संस्थेला देणे हितकारक ठरेल यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. वाहतूक व्यवस्थेसंदर्भात सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. बांधकामे जरी सुरु असली तरी त्या ठिकाणची वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी पोलीसांनी दक्षता घ्यावी असे ते म्हणाले.

नागपूर पोलीस विभागामार्फत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी नवी प्रणाली व कार्यरचना करण्यात आली आहे. एआय आधारित सिम्बा प्रणालीद्वारे गुन्ह्यांचा डाटा अपडेट करण्यात आला आहे. सिसिटिव्ही, फोटो, व्हिडीओ, ऑडिओ आदी माध्यमातून गुन्हेगारांच्या डेटांचेही संकलन करण्यात आले आहे. सोशल मिडीया यावर गरुड दृष्टी या सॉफ्टवेअरमार्फत पोलीसांची स्वतंत्र टिम अहोरात्र मॉनिटर करत असून नागरिकांना सुरक्षिततेचा प्रत्यय पोलीस प्रशासनामार्फत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या