महेश यादव यांच्या मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस, बार्शी शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी – दोन आरोपी 1.48 लाखांच्या मुददेमालासह अटकेत

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील हिरेमठ हॉस्पिटलमध्ये घडलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या काही तासांत तपास करून छडा लावला असून दोन आरोपींना १,४८,०००/- रुपयांच्या मोबाईलसह अटक करण्यात यश आले आहे.

ही घटना दिनांक १३ जून २०२५ रोजी पहाटे घडली. फिर्यादी महेश अरविंद यादव (रा. सुभाषनगर, बार्शी) हे त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू असल्याने हॉस्पिटलच्या रूम क्रमांक ०५ मध्ये थांबले होते. पहाटेच्या सुमारास त्यांनी टेबलवर ठेवलेले तीन मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी गु.र.नं. ५०५/२०२५ अंतर्गत बीएनएस कलम ३०५ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई उमाकांत कुंजीर व डीबी पथकाने तत्काळ तपास सुरू केला. हिरेमठ हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयित आरोपी ओळख पटवण्यात आली. यामध्ये सुदर्शन राजू डोंगर (वय २४, रा. लोकमान्य चाळ, लातूर रोड, बार्शी) आणि विनायक सतीश देवकर (वय २३, रा. टिळक चौक, बार्शी) यांनी मिळून चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

दोन्ही आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या अंगझडतीमध्ये चोरीस गेलेले तीन मोबाईल जप्त करण्यात आले असून एकूण मुददेमाल १,४८,०००/- रुपये इतका आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुन्हे प्रकटीकरण पथकात पोसई उमाकांत कुंजीर, सपोफौ अजित वरपे, पोहेकॉ अमोल माने, पोहेका बाबासाहेब घाडगे, पोना संगाप्पा मुळे, पोकॉ सचिन देशमुख, पोकॉ अविनाश पवार, पोकॉ सचिन नितनात, पोकॉ राहुल उदार, पोकॉ प्रल्हाद अकुलवार, चपोकॉ रामेश्वर मस्के यांनी परिश्रम घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ अमोल माने हे करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या