महाराष्ट्रयोजनाशैक्षणिकसोलापूर

अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सरकारी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या कार्यालयामार्फत अनुसूचित जाती, या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व विद्या वेतन या योजनांचा लाभ देण्यात येतो.

वरील सर्व योजना शासनामार्फत https://mahadbt.maharashtra.gov.in/Login/ या प्रणालीवरून ऑनलाईन राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता महाडीबीटी प्रणालीवरील नवीन आणि नुतनीकरणाचे आवेदन अर्ज स्वीकृत, मंजूर करण्यासाठी दिनांक 15 जून 2025 पासून महाडीबीटी प्रणाली सुरू करण्यात येणार आहे.

त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक, बिगर व्यावसायिक, तांत्रिक या सर्व महाविद्यालयांना याद्वारे सुचित करण्यात येते की, अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फि परीक्षा फि, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, विद्या वेतन या योजनांचे नवीन, नुतनीकरणाचे अर्ज विद्यार्थ्यांकडुन तात्काळ भरून घ्यावेत.

सदरचे आवेदन अर्ज मंजूरी करिता या कार्यालयाकडे ऑनलाईन सादर करण्यात यावे. उपरोक्त नमुद योजनेच्या लाभापासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहणार नाही याची सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी नोंद घ्यावी. असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button