वटपौर्णिमेचे औचित्य साधून एक ओपन स्पेस – एक वड या उपक्रमाची वृक्ष संवर्धन समिती बार्शीने सुरुवात

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : या उपक्रमांतर्गत वृक्ष संवर्धन समिती उभारणार पन्नास छोट्या वनराई यावर्षी वृक्ष संवर्धन समिती बार्शी तर्फे शहरा मध्दे पन्नास छोट्या वनराई उभारण्यात येणार आहेत. यासाठी बार्शी नगरपालिकेचे 50 ओपन स्पेस निवडण्यात आले आहेत. या ओपन स्पेस मध्ये मध्यभागी वडाचे एक झाड आणि मैदानाच्या कडेला प्रत्येक ओपन स्पेस मध्ये योग्य ठिकाणी दोन पिंपळ, दोन लिंब हे लावण्यात येणार आहेत. तसेच पक्षांना अन्न देणारे झाडे, मनुष्यांना सावली देणारी झाडे, परिसर सुशोभित करण्यासाठी काही फुलांची झाडे आणि काही दुर्मिळ वृक्ष देखील या ओपन स्पेस मध्ये लावण्यात येणार आहेत.

जेणेकरून भविष्यात त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना स्वच्छ हवा, बसण्यासाठी गारवा आणि पक्षांची किलबिलाट ऐकू येणार आहे. तसेच या निमित्ताने शहराच्या अनेक भागात छोटे-छोटे ऑक्सिजन प्लांट निर्माण होतील अशी माहिती वृक्ष संवर्धन समितीचे राहुल तावरे यांनी दिले. या उपक्रमाचा शुभारंभ आज उपळाई रोड पराग इस्टेट च्या पाठीमागील ओपन स्पेस मध्ये 25 झाडे लावून करण्यात आला. यामध्ये वड,पिंपळ, लिंब, काटेसावर, सोनसावर, कांचन, अर्जुन, गोंधन,जांभूळ, ताम्हण ताम्रवृक्ष या पर्यावरणासाठी बहु उपयोगी अशा रोपांचा समावेश आहे. इतर ओपन स्पेस मध्ये अशी बहुउपयोगी वेगवेगळी झाडे लावण्यात येणार आहेत वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी सांगितले की बहुदा महाराष्ट्रामधील हा पहिलाच उपक्रम असेल. या उपक्रमासाठी बार्शी नगरपालिका देखील मोठ्या प्रमाणात मदत करत आहे.

यावेळी बार्शी नगरपालिका माझी वसुंधरा चे गणेश पाटील साहेब, पत्रकार गणेश गोडसे,प्रा.मोहम्मद शेख,राणा देशमुख, उमेश नलवडे, अक्षय घोडके,अमृत खेडकर, आनंद धुमाळ, महेश बकशेट्टी, सुधीर वाघमारे, अक्षय भुईटे, अभिजित बोबडे, चारुदत्त जगताप, सायरा मुल्ला, गणेश कदम, राजाभाऊ अडसुळे, विरेंद्र भंडे, दादासाहेब गवळी, युवराज घाडगे, मनिषा घाडगे, गौरी तावरे, चंद्रकांत उलभगत, सचिन मस्के आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या