सोलापूर महानगरपालिकेने कोणत्या कामास किती निधी वापरता यांची माहिती ७ दिवसात सादर करावी – उपसभापती नीलम गोऱ्हे

0

पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे

B1न्यूज मराठी नेटवर्क

उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून विविध विभागाचा आढावा

सोलापूर, दिनांक 5 : महिलांवर अत्याचार होऊ नयेत यासाठी पोलीस विभागाने अधिक सतर्क रहावे. साध्या वेषातील पोलिसांची संख्या वाढवावी. भरोसा सेल मध्ये नोंद होणाऱ्या गुन्ह्याबाबत तात्काळ कार्यवाही करून गुन्हे निकाली काढावेत. तसेच समाजातील एकाही महिलावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होणार नाही यासाठी पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिला सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे असे सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित विविध विभागाच्या आढावा बैठकीत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त रवि पवार, पोलिस उप आयुक्त दिपाली काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सोलापूर एस.टी महामंडळाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी उपस्थित होते.

उपसभापती नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की,
महिलांना भरोसा कक्षाच्या माध्यमातून दक्षता समिती सक्षम करण्याची गरज आहे. दक्षता समिती यांनी प्राचार्य,शिक्षीका, प्राध्यापिका,समाजसेविका, सरपंच, समाजसेविका यांना कौटुंबिक संरक्षण कायद्याचे प्रशिक्षण द्यावे. जिल्हा परिषद, महिला बाल विकास विभाग, पोलिस विभाग यांनी एकत्र लोक अदालत आयोजित करण्यात यावी.

कौटुंबिक गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त समझोता करत असतांना नुसता नांदण्याचा दबाव आणुन हुंडा , हिंसा , व्यसने स्विकारण्यास भाग पाडून समझोता करू नये. केस हाताळतांनाच्या कार्य प्रणाली तयार करून नंतर दक्षता समिती सदस्यांना व बीट पोलीसांना गृहभेटी देण्यास सांगावे. महिलांच्या सुरक्षिततेची खात्री झाल्यावरच समझोता करावा असे त्यांनी पोलीसांना सांगितले.

जिल्हा परिषदेने महिलांच्या गरजा लक्षात घेऊन पतपेढी, गुंतवणूक, कर्ज उपलब्ध करून महिलांच्या विकासासाठी प्राधान्य द्यावे. महिलांना जास्तीत जास्त शासनाच्या सोयी सुविधा देऊन महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करावा. सोलापूर महापालिकेने नागरिकांना नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा तसेच शहरामध्ये स्वच्छता राहील या अनुषंगाने प्रयत्न करावेत.

पावसाळ्यातील ड्रेनेज ची कामे व्यवस्थितपणे झाली आहेत की नाहीत याची खात्री करावी. पंढरपूर येथील आषाढी वारीच्या अनुषंगाने एस. टी. स्थानकाची स्वच्छता करावी वारीसाठी एस.टी महामंडळाने सुस्थितीत गाड्या देण्याचे नियोजन करावे, आशा सूचना उपसभापती गोऱ्हे यांनी दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या