महाराष्ट्रयोजनासोलापूर

जिल्हा परिषद सेसफंडातून विविध योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : जिल्हा परिषद सेस फंड योजनेंतर्गत कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना पीक संरक्षण उपकरणे ट्रॅक्टरचलित अवजारे कृषी सिंचनासाठी अवजार साधने 50 टक्के अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील इच्छुक शेतक-यांनी दिनांक 20 जून 2025 पर्यंत पंचायत समिती कार्यालयाकडे परिपुर्ण कागदापत्रासह अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.

जिल्हा परिषद सेस फंडातुन कृषि विभागाकडून पिक संरक्षण औजारे/उपकरणे (श्री पिस्टन स्प्रे पंप, पॉवर स्प्रेपंप, नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड स्प्रेपंप, ब्रश कटर, सोलार इन्सॅक्ट ट्रॅप), ट्रॅक्टर चलित औजारे (रोटाव्हेटर, पल्टी नांगर, रोटरी टिलर/विडर, पेरणी यंत्र), कृषि सिंचनासाठी सुधारित औजारे साधने,. (५एच पी सबमर्सिबल विदयुत पंपसंच, डिझेल इंजिन) कृषि सिंचनासाठी सुधारित औजारे साधने (कडबाकुटटी, ताडपत्री, मधुमक्षीका पेटी, स्लरी फिल्टर) सेंद्रीय शेती (हिरवळीचे खतबियाणे, ताग, धेंचा, गांडूळ, कल्चर व बेड) 50 टक्के मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहेत. सदर योजनेमध्ये अनु-जाती, अनु-जमाती, अत्यल्पभुधारक, दिव्यांग व महिला यांना प्राधान्य राहिल.

इच्छुक शेतक-यांनी स्वतःचा 7/12.8अ, आधार कार्ड, बैंक पासबुकच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स, लाभार्थी अनु-जाती, अनु-जमातीचे असल्यास जातीचे प्रमाणपत्र व अपंग लाभार्थीसाठी अपंगत्वाच्या दाखल्याच्या झेरॉक्स प्रतिसह आपल्या पंचायत समितीकडे अर्ज करावेत. लाभाथ्यांची निवड केल्यानंतर शेतक-यांनी एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातुन अधिकृत विक्रेत्याकडून आपल्या पसंतीच्या औजाराची खरेदी करावी लागेल. सदर खरेदी करावयाचे औजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थानी परिक्षण करुन ते B.I.S अथवा अन्य संस्थानी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार/तांत्रिक निकषानुसार असावेत.

सदर योजनेत लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर शेतक-यांनी एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातुन अधिकृत विक्रेत्याकडून आपल्या पसंतीच्या औजाराची खरेदी करावी. सदर खरेदी करावयाचे औजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थानी परिक्षण करुन ते B.I.S अथवा अन्य संस्थानी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार/तांत्रिक निकषानुसार राहील. जिल्ह्यातील जास्तीत शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, ,अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, व कृषि विकास अधिकारी सोलापूर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button