अ‍ॅड. विवेक गजशिव यांना श्रीलंकेतील कोलंबो विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी बहाल

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शीतील नामवंत वकील वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. विवेक गजशिव यांना श्रीलंकेतील कोलंबो युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली. हा डॉक्टरेट पदवीदान समारंभ महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी असलेल्या पुणे येथे पार पडला. अ‍ॅड. गजशिव यांना कोलंबो विद्यापीठाने ‘हॉनररी डॉक्टरेट इन सोशल वर्कर’ म्हणून सन्मानित करण्यात आले.

गजशिव यांनी सामाजिक व राजकीय जीवनाची सुरवात बहुजन समाज पार्टीचा केडर बेस कार्यकर्ता म्हणून केली,नंतर 2016 ते 2018 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) जिल्हाउपाध्यक्ष म्हणून कार्य केले परंतू 2018 साली झालेल्या भिमाकोरेगाव दंगलीच्या विरोधात रामदास आठवले यांनी विरोधात भूमिका न घेतल्याने राजीनामा दिला व
2018 पासून भिमाकोरेगाव प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांनी टोकाची भूमिका घेतल्याने वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष,जिल्हा संघटक व सध्या जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कार्य केले.

पुढे त्यांनी दलित, शोषित, पीड़ित, बहुजन समाजासाठी काम केले. बार्शीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा करण्यासाठी पाच दिवस आमरण उपोषण देखील केले तसेच वालवड येथील स्मशानभुमी मंजूर केली,सिद्धार्थ नगर जयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी कार्यक्रम घेतले,आरोग्य व रक्तदान शिबिर, प्रबोधनाची कार्यक्रम घेतले,ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यात नेहमीच पुढाकार घेतला. गजशिव यांच्या नेतृत्वाखाली NRC,CAA आंदोलनात बार्शी शहरात एकदिवसीय बंद देखील पाळण्यात आला होता.

अ‍ॅड. विवेक गजशिव यांना यापूर्वी राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, मानवतावादी बहुउद्देशीय मंडळ संचलित राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ-क्रांती ज्योती समाजभूषण पुरस्कार,राज्यस्तरीय वीर शिवछत्रपती महाराष्ट्ररत्न पुरस्कार,राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार,आंबेडकरी योद्धा पुरस्कार,राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार,भिमयोद्धा पुरस्कार,बार्शी युथ आयकॉन पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी गजशिव यांचे सामाजिक, राजकीय सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा आणि अभिनंदन करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या