उद्घाटनबार्शी

बार्शी तालुक्यातील रातंजन येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

B1न्यूज मराठी नेटवर्क

गौतम नागटिळक

बार्शी : तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नामुळे रातंजन येथील विविध योजनेच्या माध्यमातून ३ कोटी ७२ लाख रूपये मंजूर विकास कामांचे भूमिपूजन बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.रणवीर राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

रातंजन येथे सभापती रणवीर राऊत यांच्या शुभहस्ते जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी,अंतर्गत पाईपलाईन व विहीर करणे यासाठी ६२ लाख,साठवण तलाव करणे यासाठी ४ कोटी ५० लाख,ओढा नाला सरळीकरण करणे यासाठी ६९ लाख, १५ वा वित्त आयोगातुन गावअंतर्गत विविध कामे करणे यासाठी २७ लाख,दलित वस्ती योजनेअंतर्गत ७ लाख,प्रधानमंत्री आवास योजना,रमाई आवास योजने अंतर्गत ६ घरकुले बाधणे यासाठी ७२ लाख,२५-१५ योजनेअंतर्गत गावाअंतर्गत सिमेंट रस्ता व बंदिस्त गटार करणे यासाठी १० लाख,तीर्थक्षेत्र काळभैरवनाथ मंदिर वाहनतळ व सुशोभीकरण करणे यासाठी १० लाख,पंचायत समिती स्तर पाण्याचा हौद व वैयक्तिक विहीर जनावरांचा गोठा २७ लाख आदी मंजूर कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी सुखदेव जगताप, बाबा गायकवाड, पिंटु घोडके, रामराजे देशमुख, शाहुराजे निंबाळकर, उद्योजक सचिन मडके, डॉ. सचिन चव्हाण, परमेश्वर बिले, विजय पवार, पोपट जाधव, राजेंद्र हजारे, विष्णू माने, सोनू पाटील, धनंजय जाधव, बाळासाहेब जाधव, रामेश्वर चव्हाण, संभाजी देशमुख, संतोष बचुटे, हनुमंत पवार,विजय काटकर, फुलचंद हजारे, सत्यवान देशमुख, कृष्णा देशमुख,बंडू देशमुख,नितीन जाधव, कुलदीप जाधव, प्रशांत बिले,नागेश नागटिळक, आप्पा नागटिळक,अमोल शेरकर, उत्कर्ष देशमुख, श्रीनिवास खरसाडे, प्रशांत माने,नवनाथ बोबडे, प्रमोद कुंभार,भानुदास ताटे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button