उद्घाटनपालघरमहाराष्ट्र

“मोबाईल मेडिकल व्हॅन” उपक्रमाचे आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण

सेवा आणि आरोग्यासाठी एक पाऊल पुढे…

B1न्यूज मराठी नेटवर्क

पालघर – लुपिन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या “मोबाईल मेडिकल व्हॅन” या उपक्रमाचे लोकार्पण गोऱ्हे, (वाडा ब्लॉक) पालघर येथे आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते आज झाले. जनतेसाठी आरोग्य सेवा अधिक प्रभावी, सुलभ व सर्वसमावेशक कशी करता येईल, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार करत असलेले प्रयत्न आणि त्यालाच अशा सामाजिक उपक्रमांची मिळालेली साथ खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेचा चेहरा मोहरा बदलेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ग्रामीण भागातील जनतेपर्यंत असंसर्गजन्य आजार (Non-Communicable Diseases) संदर्भातील निदान व उपचार याविषयी माहिती पोहोचवण्यासाठी लुपिन फाउंडेशनचा हा मोबाईल मेडिकल व्हॅन उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. मोबाइल मेडिकल व्हॅन, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील असंसर्गजन्य आजार (#NCD) कॉर्नर आणि समुदायावर आधारित तपासणी उपक्रमांद्वारे लाखो नागरिकांचे आरोग्य सुरळीत ठेवण्याचा हा यशस्वी प्रयत्न आहे.

ग्रामीण भागातील दुर्लक्षित आरोग्य समस्या हेरून समाजाला आरोग्य सेवा पुरविण्याच्या दृष्टीने काम करणाऱ्या लुपिन फाउंडेशनच्या सर्व टीमचे मन:पूर्वक अभिनंदन!

यावेळी खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावीत, आमदार हरीषचंद्र भोये, लुपीन फाउंडेशनच्या श्रीमती तुषारा शंकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलीस उपअधीक्षक आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button