महाराष्ट्रसातारासामाजिक

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाशकंदील ने दिले मतदान जनजागृतीचा संदेश, वाघमोडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा अनोखा उपक्रम

B1न्यूज मराठी नेटवर्क

सातारा दि. 25 : सातारा जिल्हा परिषदेची माण तालुक्यातील गोंदवलेकर महाराजांच्या नगरीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडेवाडी यांनी राबवला अनोखा उपक्रम राबवला. मतदान जनजागृतीचा संदेश लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा असा प्रश्न या शाळेतील नवोपक्रमशील शिक्षिका सौ भारती ओंबासे यांना पडला. तेव्हा त्यांनी शाळेमध्ये आकाशकंदील निर्मिती कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना आकाशकंदील तयार करण्यास सांगितले व प्रत्येक आकाशकंदील वर निर्मिती कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे आकाशकंदील तयार करण्यास सांगितले व प्रत्येक आकाशकंदील वर एक घोषवाक्य लिहून आणा असे सांगितले. आज शाळेचा एकूण 49 पट आहे आणि 49 विद्यार्थ्यांनी आकाशकंदील बनवून मतदान जनजागृती केली.

मतदान जनजागृती साठी बऱ्याच शाळामध्ये रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा ,घोषवाक्य स्पर्धा अशा एक ना अनेक विविध स्पर्धा, शाळांमध्ये राबवल्या जातात परंतु त्या स्पर्धा शाळेपुरत्या मर्यादित राहतात. ग्रामीण भागातला हा स्तुत्य उपक्रम ठरला आहे…नुकतीच दिवाळी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या आकाश कंदील घरोघरी लागतील.त्याचबरोबर मतदान जनजागृती संदेश घरोघरी तर पोह्चतीलच पण शेजारी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ते संदेश पाहायला मिळतील. शाळेतील या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे . या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सदस्य व सर्व पालक शाळेचे मुख्याध्यापक दादा कट्टे, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे ,शिक्षण विस्ताराधिकारी रमेश गंबरे, केंद्रप्रमुख सौ. शोभा पवार सर्वांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button