बार्शी

श्रीपतपिंपरी मधील पूल बनला धोकादायक , नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे ,दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : श्रीपतपिंपरी गावाच्या अलीकडे असणाऱ्या, बार्शीअन्‌ माढा तालुक्‍याला जोडणाऱ्या ओढ्याच्या पुलावरून मागील कित्येक दिवसांपासून पाणी वाहत असून, ग्रामस्थ व प्रवाशांचे पुलावरील पाण्यातून दळण-वळण सुरू आहे. पुलास संरक्षण कठडे अथवा अँगलचे गार्ड नसल्याने जीव मुठीत घेऊन सर्वजण ये-जा करताना दिसुन येतात. या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी अनेक वर्षापासून ग्रामस्थांची आहे. तालुक्‍यातील कुसळंब, बार्शीतील घोर ओढा, कासारवाडी, कोरफळे, अलीपूर, खांडवी येथील लहान-मोठ्या ओढ्यांतून पाणी श्रीपतपिंपरी येथील ओढ्याला येत असल्याने ओढा वर्षातील आठ महिने वाहत असतो.

स्थानिक शेतकरी दयानंद पिंगळे, कुलदीप पिंगळे, उमेश पिंगळे व आदी नागरिकांना विचारणा केली असता तेथे त्यांनी सांगितले की, आम्ही गटविकास अधिकारी यांना वारंवार सांगून देखील व मोबाईल मधील व्हिडिओ दाखवून देखील गटविकास अधिकारी श्री सावंत पंचायत समिती बार्शी यांनी याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही, असे दयानंद पिंगळे व इतरांनीही सांगितले.


याच श्रीपत पिंपरी पुलाचे डाग डुज करण्याचे काम झाले होते, ते काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे झाले असल्याने त्याची माहिती माहिती अधिकार अंतर्गत विनंती अर्जाद्वारे मागवली होती. परंतु त्यासंबंधित ग्रामसेवक यांनी कोणतीही दखल घेतली नाही व प्रशासन अधिकारी यांनी चुकीचे उत्तर दिले, यावर कित्येक वेळा समक्ष भेटून तक्रारी केल्या, परंतु त्यांनी त्याबाबत कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही ना कोणती दखल घेतली, त्यात बांधकाम उपविभाग बार्शी यांनी माहिती दिली ती माहिती अपूर्ण आहे, याबाबत अधिक पाठपुरवठा चालू आहे, लवकरच याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागेल, व सत्य काय हे सर्व नागरिकांसमोर आणले पाहिजे याच वाहत्या पाण्याच्या प्रवाहामुळे कित्येक वाहनांचे नुकसान होत आहे,नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे, जर यात काही जीवित हानी झाली तर हेच सबंधित अधिकारी या निष्पाप लोकांच्या होणाऱ्या नुकसानीला व जीवित हानीला जबाबदार राहतील का असा प्रश्न दयानंद पिंगळे यांनी बोलताना उपस्थित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button