बार्शीचे सुपुत्र सचिन वायकुळे यांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2025 जाहीर, दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते पुण्यामध्ये शाही थाटात होणार वितरण सोहळा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी – गेल्या दहा वर्षापासून स्मार्ट अकॅडमीच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील हजारो विद्यार्थी, युवक, युवती व राजकारण्यांना भाषणाचे धडे देऊन मुलुख मैदानी तोफ बनविणारे स्मार्ट अकॅडमी चे संचालक सचिन वायकुळे यांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा “महाराष्ट्र महागौरव पुरस्कार” 2025 नुकताच जाहीर झाला असून, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रकांत दादा पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आयुष्यमान भारत महाराष्ट्र राज्य समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या शुभहस्ते पुणे येथे दिनांक 25 मे 2025 रोजी, शाही थाटात पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार असल्याचे संघटनेचे सर्वेसर्वा तथा संस्थापक / अध्यक्ष राजा माने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

सचिन वायकुळे यांनी भारतामध्ये पहिल्यांदाच तृतीयपंथीयांना न्याय मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक कामगिरी करून, महाराष्ट्रामध्ये एक वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. तृतीयपंथीयांना रेशन कार्ड मिळवून देणे, मतदान कार्ड मिळवून देणे, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देणे, घरकुल योजना मिळवून देणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे तसेच समाजामध्ये एक मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून राज्यामध्ये एक वेगळा आदर्श आणि पॅटर्न निर्माण करून तृतीयपंथीयांना न्याय मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. वायकुळे यांनी केलेल्या तृतीयपंथीयांच्या विशेष कार्याची दखल घेऊन, त्यांची पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे निवड समितीने सांगितले आहे.

बार्शीपुत्र सचिन वायकुळे यांच्या निवडीबद्दल सबंध महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातून त्यांच्या कार्याचे कौतुक करत अभिनंदन केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या