बार्शीशैक्षणिकसामाजिक

सोलापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठेचा, मानाचा असणारा कै. बाबुरावजी डिसले जीवनगौरव पुरस्कार वितरण

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग प्रतिनिधी : गौतम नागटिळक
वैराग : सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बार्शी यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या मान्यवरांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शिवप्रभा शैक्षणिक संकुल, नागोबा चौक याठिकाणी जेष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजेंद्र दास यांच्या शुभहस्ते करण्यात आले . यावेळी संस्थेचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष रविंद्र कापसे, प्राचार्या श्रीम. अर्चना डिसले , सचिव प्रताप दराडे सर मान्यवर उपस्थित होते.
सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बार्शीच्या वतीने दिले जाणारे कै बाबुरावजी डिसले जीवन गौरव पूरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कै शिवाजीराव डिसले शेठ यांच्या जयंती निमित्त या पूरस्काराचे पुरस्कार पुढीलप्रमाणे
महिला भुषण पूरस्कार प्रा. डॉ. महानंदा बाळासाहेब बगले (मडसनाळ) ,
शैक्षणिक पूरस्कार प्रदिपकुमार दुधाजीराव दराडे (बार्शी) ,
सामाजिक संस्था पूरस्कार वृक्ष संवर्धन समिती बार्शी ,
साहित्य पूरस्कार मारुती सिद्राम कटकधोंड सोलापूर ,
क्रीडा पुरस्कार प्राचार्य हरिदास महादेव रणदिवे,
,कला पूरस्कार गजेंद्र निकम (शिल्पकार), बार्शी.
सांस्कृतिक पूरस्कार श्रीकांत चंद्रकांत कुंभारे बार्शी,
पत्रकारिता पूरस्कार आनंदकुमार उत्तमराव डुरे (पत्रकार दै. लोकमत ) ,
अध्यात्मिक पूरस्कार ह. भ. प. रंगनाथ महाराज काकडे ढोराळेकर ,
कर्मचारी भुषण माधव धर्मराज धेंडे साकत पिंपरी ,
युवा उद्योजक अनिकेत गजानन कलशेट्टी सोलापूर या मान्यवरांना प्रदान करण्यात आले .
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर , पालक उपस्थित होते . सुत्रसंचालन सोमनाथ घायतिडक यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्णव शैक्षणिक संकुलातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button