कारमधून बनावट दारूसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : राज्य उत्पादन शुल्क विभागाने 25 सप्टेंबर रोजी बार्शी तालुक्यात उपळेदुमाला या गावी एका स्विफ्ट डिझायर वाहनातून टॅंगो पंच ब्रॅंडच्या बनावट देशी दारुच्या 32 पेट्या जप्त केल्या असून कारवाईत वाहनासह पाच लाख 12 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक सदानंद मस्करे यांना अवैध दारूच्या वाहतुकीबाबत मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार त्यांनी 25 सप्टेंबर रविवार रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास बार्शी-तुळजापूर रोडवरील उपळेदुमाला या गावाच्या हद्दीत सापळा रचला असता त्यांना एक स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक MH12 NU 2752 संशयितरीत्या वेगाने जात असल्याचे दिसून आले. सदर वाहनाचा पाठलाग करून वाहनास थांबवले असता त्या वाहनात दोन इसम आढळून आले, अंधाराचा फायदा घेऊन दोन्ही इसमांनी घटनास्थळावरून पळ काढला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाहनाची झडती घेतली असता वाहनात देशी दारू टॅंगो पंच 90 मिली क्षमतेच्या 32 पेट्या बनावट दारूचा साठा आढळून आला. जप्त केलेल्या दारूची किंमत एक लाख 12 हजार इतकी असून वाहनासह एकूण पाच लाख 12 हजार किंमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. दोन्ही फरार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. सदर कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग सदानंद मस्करे, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, प्रशांत इंगोले व वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकाने केली आहे.या विभागाकडून अवैध दारु निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध कारवाईकरिता 6 पथके नेमण्यात आली असून कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू/ ताडी निर्मिती /वाहतूक /विक्री /साठा, बनावट दारू, परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या