बार्शीच्या धम्म परिषदेला बाबासाहेबांचे नातु भिमराव आंबेडकरांची राहणार उपस्थिती…

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथे १० मे २०२५ रोजी होणाऱ्या बौद्ध धम्म परिषदेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भिमराव यशवंत आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. भिमराव आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे प्रमुख आहेत. अधिक माहिती अशी की बार्शीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले होते या घटनेला १०० वर्ष पूर्ण झाले आहेत.
१० मे १९२४ रोजी बार्शीमध्ये मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर आले होते. यावेळी त्यांनी नामांतर,देशांतर आणि धर्मांतर या विषयावर ऐतिहासिक भाषण केले होते. या शतकोत्तरी वर्षानिमित्त भारतीय बौद्ध महासभा, नालंदा स्तूप बुद्धीजम ॲण्ड रिसर्च ट्रस्टच्या वतीने दुसऱ्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या बौद्ध धम्मपरिषदेच्या कार्यक्रमाप्रसंगी भिमराव यशवंत आंबेडकर यांना बार्शी नगरपरिषदेच्यावतीने मानपत्र दिले जाणार असल्याची माहिती भारतीय बौद्धमहासभेचे बार्शी तालुकाध्यक्ष सत्यजित जानराव, सामाजिक कार्यकर्ते ॲड. विवेक गजशिव यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले. यावेळी १ मे ते १० मे या कालावधीत श्रामणेर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
बौद्ध धम्मपरिषद यशस्वी करण्यासाठी बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे रमेश पालके, विश्वास वाघमारे, प्रविण आखाडे, शंकर जाधव, पंडीत राजगुरू, सचीन पालके, किरण भालशंकर, सचीन जानराव, समाधान ननवरे, प्रसाद शिंदे, बाळासाहेब सरवदे, कल्पणा तुपेरे, पूजा रिकीबे, निर्मला वाघमारे, आरती सरवदे हे विशेष परिश्रम घेणार आहेत.