निवडपत्रकार विषयकबार्शीमहाराष्ट्र

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना तालुका अध्यक्षपदी गणेश शिंदे तर सचिव पदी गोविंद भिसे यांची निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही राज्यातील पहिली नोंदणीकृत संघटना असून आज रोजी संघटनेचे 12000 पेक्षा जास्त सभासद नोंदणी झाली असून संघटनेचे तिसरे अधिवेशन लवकरच होणार असून संघटनेच्या पुढील दमदार वाटचालीसाठी स्वतः संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी बार्शी मध्ये येऊन कार्यकारणी जाहीर केली.

कार्यकारणी जाहीर करत असताना माने साहेब यांनी स्पष्ट निर्देश दिले की आपण कोणाच्या विरोधात नाही व आपण कोणाच्या सोबत नाही आपली संघटनाही सत्यावर काम करणारी संघटना आहे.

संघटनेची नवीन कार्यकारणी खालील प्रमाणे –
तालुका अध्यक्ष गणेश शिंदे , तालुकाशहर उपाध्यक्ष अभिजीत शिंदे, तालुका ग्रामीण उपाध्यक्ष भैरवनाथ चौधरी , सचिव गोविंद भिसे, खजिनदार किरण माने, कार्याध्यक्ष संतोष राजगुरू, प्रसिद्धी प्रमुख राहुल भालशंकर, संघटक अक्षय बारंगुळे, तसेच तालुका कार्यकारणी बरोबरच काही राज्याच्या व जिल्ह्याच्या देखील निवडी करण्यात आल्या. पश्चिम महाराष्ट्र सहसचिव विजय कोरे,महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख म्हणून धीरज शेळके, तसेच महिला आघाडी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष वैशाली ढगे तर महिला आघाडी सोलापूर जिल्हा कार्यकारणी सदस्य राजश्री गवळी यांची निवड करण्यात आली.

संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत संघटनेत चांगल्या पद्धतीने काम करा व अधिवेशनाला देखील सर्वांनी मिळून हजेरी लावा असे निर्देश राजाजी माने साहेब यांनी नवीन कार्यकारणी सह सर्व पदाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश सावंत, राज्य संघटक मुरलीधर चव्हाण, संघटनेचे कोषागार अमित इंगोले, राज्य सदस्य संतोष सूर्यवंशी,सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण नागणे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन कुलकर्णी इत्यादी पदाधिकारी हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button