पुरस्कारबार्शीमहाराष्ट्र

डॉ. प्रवीण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : छत्रपती संभाजीनगर येथे 29 मार्च 2025 रोजी पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक महासंघ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दुसऱ्या परिवर्तनवादी साहित्य संमेलनाच्या वतीने डॉ. प्रवीण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकात “डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार” देण्यात आला. हा पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षा सूर्यकांता गाडे यांच्या हस्ते दिला गेला व हा पुरस्कार वसुधा कल्याणकर यांनी स्वीकारला. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे तसेच मुख्य संयोजक प्रा. समाधान दहिवळ यांचेसह आदी उपस्थित होते.

या पुस्तकाच्या निमित्ताने मराठी भाषेतला व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास एकत्रित रूपाने उपलब्ध नव्हता तो या पुस्तकातून वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे , हे पुस्तक व्यंगचित्रकार, पत्रकारितेचे, मराठी भाषा व इतिहासाचे अभ्यासक यांना उपयोगी संदर्भ ग्रंथ आहे. व्यंगचित्र पत्रकारिता क्षेत्रातील हे निराळे व अभ्यासपूर्ण पुस्तक आहे. साधारण आठराव्या शतकापासून चा ऐतिहासिक शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. या पुस्तकाला पुआहो सोलापूर विद्यापीठाचे पत्रकारिता विभागाचे मा. विभागप्रमुख प्रा. डॉ. रवींद्र चिंचोलकर यांची प्रस्तावना तर मलपृष्ठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पत्रकारिता विभागाचे मा. प्रा. सुरेश पुरी यांचा शुभेच्छा संदेश आहे.

या पुरस्कारासाठी बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन मा. प्रभाताई झाडबुके तसेच खजिनदार मा. वर्षाताई ठोंबरे – झाडबुके श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. मनोज गादेकर, प्रा. डॉ. जगन्नाथ पाटिल, प्रा. तानाजी ठोंबरे, प्रा. डॉ. सुहास कुलकर्णी भारत इतिहास संशोधन मंडळाचे राजेश जाधव, आई सुरेखा मस्तुद तसेच मित्र, शिक्षक, शिक्षकेतर बंधू, पुरोगामी चळवळीतील सहकारी यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button