परभणीमहाराष्ट्र

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे धनादेश वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क

परभणी : जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले. सोमवारी (दि. 24) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.

सन 2024-25 मध्ये परभणी तालुक्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये अभिमान बबन राजगूरे (पिंपरी देशमुख), संभाजी गणपती गारूडी (टाकळी कुंभकर्ण), दिनेश अशोक होरगूळे (कैलासवाडी), गजानन आबासाहेब पोले (पिंपळा), परमेश्वर लक्ष्मण अंभोरे (डिग्रस), रामप्रसाद बालासाहेब मोरे (पिंपळगाव स.मि.), गंगाधर नामेदव भुजबळ (पोरजवळा), अनिल माणिकराव देशमुख (शहापूर), दगडु सोपानराव सरवदे (पोखर्णी नृ.), बबन नारायण ढगे (पिंपळगाव ठोंबरे), लक्ष्मण किशन जोरवर (पोखर्णी) आणि बबनराव भिमाशंकर बोंबले (शहापूर) यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार डॉ. संदीप राजापूरे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button