महाराष्ट्रसोलापूर

विजापूर सर्व्हिस रोडवरील झालेले अतिक्रमण नागरिकांनी स्वतःहुन कडून घ्यावी अन्यथा कारवाई करण्यात येईल – आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : शहरातील विजापूर नाका ते सैफुल सर्व्हिस रोड फळ विकर्ते, भाजी पाल विकणारे तसेच वाळू डेपो इतर अतिक्रमण या ठिकाणी झाले असून आज महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या सह पोलीस उपायुक्त विजय कबाडे, उपायुक्त तैमूर मुलाणी, सहा.आयुक्त शशिकांत भोसले सह नगररचना संचालक मनिष भीष्णूरकर, PWD हायवेचे श्री सुतार, श्री राजगुरू,नीलकंठ मठपती अतिक्रमण विभागाचे हेमंत डोंगरे,सुफियान पठाण आदी मान्यवर उपस्थिती होते.

विजापूर नाका ते सैफुल सर्व्हिस रोड वरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत खोके, लाकडी खोके, खाद्या पदार्थ, चायनीज गाड्या, कच्चे बांधकाकात केलेले गोडवून, लोखंडी खोके इत्यादीचे अतिक्रमण झाले असून ते अतिक्रमण ज्याचे आहे त्यांनी स्वतःहुन कडून घ्यावे असे आव्हान आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button