न्यायालयातील महसूल विषयक प्रकरणे लोकअदालतीत निकाली अपर जिल्हाधिकारी स्तरावर प्रथमच लोकअदालतीचे आयोजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर दि.21 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश व. स्तर, सोलापूर यांचे सूचनेनुसार महसूल विषयक प्रकरणातील उभय पक्षकार यांच्यामध्ये सामंजस्याने व आपआपसात तडजोड होऊन महसूल प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्ह्यात जिल्हास्तरावर, उपविभाग व तालुकास्तरावर आज लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले होते.

जिल्हास्तरावरील अपर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयातील, उपविभागस्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयातील व तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या न्यायालयातील महसूल विषयक प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. उभय पक्षकारांतील तडजोडीने काही प्रकरणे निकाली काढण्यात अपर जिल्हाधिकारी यांचेस्तरावर प्रथमच लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले होते.

सदर लोकअदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांचेकडून सहा. लोकअभिरक्षक आर. एस. पाटील, लोकअभिरक्षक कार्यालय सोलापूर व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विधी अधिकारी वर्धमान वसगडेकर, यांची नियुक्ती करण्यात आलेली होती, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी दिली.

नागरिकांची आर्थिक, वेळेची बचत व्हावी व आपआपसातील वाद सामंजस्याने मिटावेत हा लोकअदालत घेण्यामागचा उद्देश असून, यापुढे आयोजीत करण्यात येणाऱ्या लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकार यांनी लाभ घ्यावा असे आवाहन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या