महाड क्रांतीभुमीत भिमसृष्टी उभारण्यात यावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

0

चवदार तळे सत्याग्रहाच्या 98 व्या वर्धापनदिनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना चवदार तळे येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले विनम्र अभिवादन

B1न्यूज मराठी नेटवर्क

महाड /मुंबई : क्रांतीसुर्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चवदारतळे येथे केलेल्या पाण्याच्या सत्याग्रहाला पुढील वर्षी शतक महोत्सवी वर्ष सुरु होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने महाड क्रांतीभूमीत 200 एकर जमीन संपादीत करुन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीकार्यावर आधारित भिमसृष्टी निर्माण करावी त्यासाठी आपण राज्यसरकार कडे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी महाड येथे केले.

महाड चवदार तळाच्या 98 व्या वर्धापनदिनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी चवदार तळे येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पाहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे देशाला सर्वधर्मसमभावाचा ; धर्मनिरपेक्षतचा मार्ग दिलेला आहे. सर्वधर्मसमभाव हीच रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. देशात चालणा-या वेगवेगळया घटनांवर आणि औरंगजेबाच्या कबरीबाबत बोलतांना या देशात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने मुगलशाही महाराष्ट्राच्या मातीत गाडली आहे. जुन्या वादामध्ये कोणीही पडु नये. औरंगजेबाशी येथिल मुस्लिमांनी नाते कोणी सांगु नये. हिंदु आणि मुस्लिम असा भेदभाव नको. वाद बाजूला सारुन सर्वांनी शांततेने राहिले पाहिजे. छत्रपती संभाजी नगर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक राज्य सरकारने उभारले पाहिजे. अशी मागणी रामदास आठवले यांनी यावेळी केली.

छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम सदैव संस्मरणीय आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि त्यांचे जीवन हे संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे. त्या पराक्रमी वीर संभाजी महाराजांचे भव्य प्रमाणात स्मारक छत्रपती संभाजी नगरमध्ये उभारल्यास देशाला येणा-या पिढीला ते प्रेरणादायी ठरेल. राज्य सरकारने छत्रपती संभाजी नगरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारावे अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी यावेळी केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या