बार्शीमहाराष्ट्र

सचिन वायकुळे लिखित ‘तिमिर छेदताना’ पुस्तकाचे रविवारी सोलापुरात प्रकाशन

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील लेखक सचिन वायकुळे लिखित डॉ. सुनीलकुमार लवटे जीवन चित्र ‘तिमिर छेदताना’ या पुस्तकाचे येत्या रविवारी ( दि.२३) सोलापुरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात दुपारी दोन वाजता प्रकाशन होत आहे.

कोल्हापूरस्थित अविष्कार फाऊंडेशन यांच्यावतीने हा पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भारत सरकारच्या मागासवर्गीय आयोगाच्या माजी सदस्या सुरेखा लांबतुरे व अविष्कार फाऊंडेशन कोल्हापुरचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत वायकुळे यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

या कार्यक्रमासाठी माजी सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे, डॉ. अनिल देशमाने, जब्बार शिकलगार आदी उपस्थित राहणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते तथा लेखक सचिन वायकुळे यांचे हे सहावे पुस्तक असून एका अनाथ मुलाची प्रेरक यशोगाथा यात रेखाटण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button