विकास बनसोडे या बौध्द युवकाच्या ऑनरकिलिंगमुळे झालेल्या निर्घुण हत्येचा तीव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : बिड जिल्हातील आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी या गावात ट्रक चालक म्हणुन काम करणाऱ्या बौध्द युवक विकास बनसोडे यांची प्रेम प्रकरणाच्या संशयावरून अत्यंत निर्घुण हत्या करण्यात आली.दोन दिवस घरात डांबुन ठेवून बेदम मारहान करुन क्रूरपणे आकाश बनसोडे ची हत्या करण्यात आली. या निर्घुण हत्येचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.

मानवतेला काळीमा फासणाऱ्या या हत्याकांडातील मारेकऱ्यांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली आहे. मयत विकास बनसोडे हा मुळचा जालना जिल्हातील भोकरदन तालुक्यातील बोरगाव तरीचा रहिवाशी आहे. प्रेम प्रकरणाच्या संशयातुन विकास बनसोडे ची झालेली हत्या ऑनरकिलिंग चा प्रकार आहे. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हयात भोर तालुक्यात ऊत्रोली गावातील विक्रम गायकवाड हा बौध्द युवक ऑनरकिलिंग चा बळी ठरला होता.

जातीवादातुन घडणाऱ्या या ऑनरकिलिंगच्या घटनांचा आम्ही तिव्र निषेध करतो. दलित बौध्द युवकांच्या ऑनरकिलिंग मुळे झालेल्या या दोन्ही हत्या प्रकरणाचा सखोल तपास करुन सर्व आरोपींना अटक करावी आणि हा खुन खटला जलद गती न्यायालयात चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे.

गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी या ऑनरकिलिंगच्या घटना रोखण्यासाठी यातील मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी आणि बळीतांना जलदगतीने न्याय देण्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे.

दरम्यान विकास बनसोडे हत्या प्रकरणी 6 आरोपी अटकेत आहेत उर्वरित सर्व आरोपींना येत्या आठवड्यात अटक न केल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बीड मध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष आणि युवक आघाडी चे राज्य अध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या