पी.एम. किसान “एपीके लिंक उघडताच शेतकऱ्यांची बँक खाते होताहेत रिकामी”शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क
रायगड : शासन निर्णय क्रमांक किसनि-२०२३/प्र.क्र./४२/११ दिनांक १५ जून २०२३ अन्वये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान) अंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर PM Kisan list. APK किंवा PM Kisan APK या msg ची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असले रक्कम गायब होत आहे.
शेतकऱ्यांनी मोबाईलवर PM Kisan list. APK किंवा PM Kisan APK या msg ची लिंक उघडू नये किंवा सदर लिंक चा वापर शेतकऱ्यांनी करू नये. तसेच अशी काही घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास त्वरित जवळचा संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रायगड, श्रीमती वंदना शिंदे यांनी केले आहे.