महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेल्या व राज्य पुरस्कार परीक्षा उत्तीर्ण महाराष्ट्र विद्यालय बार्शीच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तामिळनाडू येथे डायमंड राष्ट्रीय स्काऊट गाईड जांबोरी-साठी निवडझालेल्या व भोर पुणे येथे पार पडलेल्या राज्य पुरस्कार चाचणी परीक्षा यात उत्तीर्ण झालेल्या सर्व स्काऊट गाईड यांचा सन्मान करण्यात आला , या राष्ट्रीय जांबोरीत संपूर्ण देशभरातून २७ राज्य, ४ देशातील विद्यार्थी व शिक्षक या स्पर्धेत सहभागी झाले होते.
या जांबोरीसाठी संपूर्ण राज्यातून ८८५ स्काऊट गाईड यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये बार्शी येथील महाराष्ट्र विद्यालय चे ०८ स्काऊट, ०७ गाईड, ०१ स्काऊट मास्टर व ०१ गाईड कॅप्टन यांची निवड करण्यात आली होती.
या राष्ट्रीय स्काऊट जांबोरीत फिजिकल डिस्प्ले,संचलन, स्टेट डे, शोभायात्रा, ग्रुप डान्स,फुड प्रदर्शन, कलर पार्टी व संचलन , ग्लोबल विलेज,ॲडव्हेंचर ,अशा विविध स्पर्धा झाल्या.तसेच उद्घाटन समारंभ व समारोप मध्ये महाराष्ट्राची लेझिम चे प्रदर्शन केले.अशा विविध ठिकाणी देखील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट सादरीकरण केले.
या टिममध्ये अथर्व बिडकर, अथर्व शिंदे,रणवीर मोरे, अथर्व यादव, अथर्व सातपुते, शुभम यादव ,सुखदेव गव्हाणे, सिध्दार्थ धुमाळ, आदिती पाटील, मृदुला गुरव, स्मिती निकम, स्वराली हावळे,मधुरा गुळवे, दिव्यांजली परबत, वेदांगी गुंजाळ, प्रतीक्षा गव्हाणे, आरती बरडे,प्रथमेश आवारी, स्वप्निल गव्हाणे, संस्कार गादेकर स्काऊट मास्टर योगेश उपळकर, गाईड कॅप्टन वैष्णवी सगट हे होते.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक एस. सी. महामुनी, पर्यवेक्षिका एन.बी. साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी. टी. पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य ए. पी. देबडवार, संस्थेचे खजिनदार तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. मिराताई यादव , एस. बी. शेळवणे, सर्व कार्यकारिणी सदस्य ,सर्व संस्था सदस्य, स्काऊट गाईड जिल्हा संघटक श्रीधर मोरे, अनुसया सिरसाठ यांनी अभिनंदन केले.