“मी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेत नाही” – रोहित शर्मा

B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने स्पष्टपणे सांगितले की, “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेत नाही. मी फक्त हे सुनिश्चित करू इच्छितो की कुठलीही अफवा पसरू नये.”
यासोबतच रोहितने संघाच्या एकत्रित प्रयत्नांचे कौतुक केले आणि भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 4 गडी राखून पराभूत केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
भारतीय संघाने या विजयासह ICC च्या मोठ्या स्पर्धेत आणखी एक चमकदार कामगिरी केली आहे, आणि रोहितच्या नेतृत्वाखालील संघाने आणखी एक मोठे विजेतेपद आपल्या नावे केले आहे.