प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या वॉटरशेड रथ यात्रेस हिरवा झेंडा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

परभणी : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत केंद्र शासनाच्या भूमी संसाधन विभाग ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार व मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन व वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंगी म्हाळसा व मानकेश्वर येथे गुरुवार (दि.6) रोजी वॉटरशेड रथास हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीमती संगिता चव्हाण तर प्रमुख उपस्थिती श्रीमती श्वेता नारायण (वॉटर शेड यात्रा ऑब्झर्वर, दिल्ली) तसेच जिल्हा जलसंधारण अधिकारी कविराज कुच्चे, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी बी. के. पाटील, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी दौलत चव्हाण, तहसीलदार राजेश सरवदे, उप विभागीय जलसंधारण अधिकारी एस.डी. मोडवन उपस्थित होते.

यावेळी सावंगी म्हाळसा येथे केंद्र शासनचे वॉटरशेड यात्रा मोबाईल व्हॅनचे आगमन झाले. या वॉटरशेड यात्रा कार्यक्रमात जि.प. शाळेतील विद्यार्थी यांनी लेझिमद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे यांनी, सर्जे यांच्या सह जलसंधारण अधिकारी व कर्मचारी परभणी-सेलू, तालुका कृषी अधिकारी जिंतूर, तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव –कर्मचारी, सावंगी-म्हाळसाचे मुख्याध्यापक, सिस्टिम ॲडमिन आणि प्रकल्पातील पाणलोट विकास पथक कृषी तंज्ञ, सिव्हिल इंजिनिअर, शिक्षक, उमेद,आत्मा, जिल्ह्यातील संस्था व गावातील युवक, शेतकरी, महिला बचत गट उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हा जलसंधारण अधिकारी के.जे. कुच्चे यांनी केले तर सूत्र संचालन सतिश कटारे यांनी केले. तसेच उपस्थित सर्व मान्यवर यांनी पाणलोट संकल्पना या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा दरम्यान येथील उपस्थित ग्रामस्थ यांना मृद व जलसंवर्धनाची शपथ देण्यात आली. पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले, प्रश्नमंजुषा, क्विझ कार्यक्रम व विजेत्यांना पारितोषिक वाटप, यावेळी निबंध, रांगोळी स्पर्धेतील विजेते व पाणलोट योद्धा व धारिणीताई यांना मान्यवरांच्या यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पाणलोट योजनेतून मंजूर असलेल्या एनआरएम कामाचे भूमिपूजन करण्यात आले व योजनेतून पूर्ण झालेल्या एनआरएम कामाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी श्रमदान व वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या