आंबेडकरी चळवळीचे लोकशाहीर दिवंगत प्रभाकर पोखरीकर यांचे मुंबईत स्मारक उभारणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई दि.6 : आंबेडकरी चळवळीला आपले जीवन समर्पित केलेले लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांनी कवी गीतकार संगीतकार म्हणून दिलेले योगदान प्रेरणदायी आहे. त्यांनी आपल्या गीतातून समाजप्रबोधन केले. अंधश्रद्धेवर प्रहार केला. आंबेडकरी चळवळीतील त्यांचे योगदान अजरामर आहे. दिवंगत लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांच्या स्मृती जोपासण्यासाठी मुंबईत त्यांचे भव्य स्मारक उभारले पाहिजे.
समाजाच्या हिता साठी रिपब्लिकन ऐक्य व्हावे ही त्यांची इच्छा होती.समाजाचे ऐक्य होणे हीच खरी लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व येथे दिवंगत लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांच्या जाहीर श्रद्धांजली सभेत ना. रामदास आठवले बोलत होते.रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिवंगत लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांच्या जाहीर श्रद्धांजली सभेचे आयोजन माता रमाबाई अंबेडकर नगर येथे करण्यात आले होते.
यावेळी आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते समाज सेवक आणि सर्व गायक गीतकार कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.लोकशाहीर दिवंगत प्रभाकर पोखरीकर यांना श्रद्धांजली वाहण्यास सर्व आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने एकत्र आला असल्यामुळे एक आंबेडकरी चळवळीचे वातावरण यावेळी अनुभवायास मिळाले. यावेळी बुद्धगया येथील महाविद्याहाविहार मुक्ती साठी आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा कृतिशील पाठिंबा असल्याचे ना.रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केले.
यावेळी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी दिवंगत प्रभाकर पोखरीकर यांनी आपल्या प्रल्हाद शिंदे नंतर वडील म्हणून प्रेम दिले.बालपणापासून आम्हाला प्रभाकर पोखरीकर यांनी आम्हाला पित्याची माया दिले.त्यांच्या निधनाने आज मी पोरका झालो असल्याची शोकभावना गायक आनंद शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी राज्यभरातून आलेल्या गायकांनी दिवंगत लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांना गायनातून श्रद्धांजली वाहिली.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि परिवर्तन कलाहासंघाचे सर्व प्रमुख गायक आणि पदाधिकारी उपस्थित होते.