महाराष्ट्रयवतमाळ

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड धर्मपाल मेश्राम यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा

B1न्यूज मराठी नेटवर्क

यवतमाळ : अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड धर्मपाल मेश्राम यांनी शासकीय विश्राम भवन येथे अनुसूचित जातीच्या कल्याणसाठी योजना राबविणाऱ्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजना व उपक्रमांची माहिती त्यांनी जाणून घेतली.

यावेळी जिल्हा जात पडताळणी समितीच्या सदस्य तथा उपायुक्त प्राजक्ता इंगळे, समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त मंगला मुन, यवतमाळ नगरपरिदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, वणी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे निरिक्षक सचिन महल्ले, प्रमोद मोपारी उपस्थित होते.

शासनाच्यावतीने अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे. विभागाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवा. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसह अपंग, कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजना, पात्र लाभार्थ्यांना शेळी गट वाटप, दुभत्या जनावरांचे वाटप करतांना लाभार्थ्यांचे यातून उत्पन्न कसे वाढेल, याचाही विचार योजना राबवितांना केला पाहिजे.

जिल्हा परिषद समाजकल्याण व समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती त्यांनी घेतली. जिल्हा जात पडताळणी समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या वैधता प्रमाणपत्र वाटपाचे कामकाज, दाखल अर्ज, प्रलंबित अर्ज व समितीच्या कामकाजाची माहिती घेऊन उपयुक्त सूचना मेश्राम यांनी केल्या.

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहांची नियमित तपासणी केली जावी. ज्या संस्था तपासणीत बंद आढळून आल्या असतील त्यांची चौकशी करावी. तपासणी व चौकशी अहवाल आयोगास सादर करण्यात यावा. कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती घेऊन त्यांनी सूचना केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button