निवेदनबार्शीमहाराष्ट्र

बार्शी शहर छावा संघटनेच्या वतीने छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याबाबत बार्शी तहसीलदार यांना निवेदन

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : संभाजी महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्राच्या रघात वाहणाऱ्या रक्तासारखा आहे. पण दुर्दैवाने तो इतिहास काळाच्या ओघात पुसला जातोय आजच्या पिढीला माहिती नाही. की आपल्या मातीत एक असा राजा होऊन गेला. जो नडला झुंजला आणि मरण पत्करले पण झुकला नाही.

छावा हा केवळ चित्रपट नाही, तो आपली मुळे शोधण्याचा प्रयत्न आहे. हा चित्रपट प्रत्येक घरात पोचला पाहिजे मुलांच्या मनात जागा केली पाहिजे, संभाजी महाराजांचे बलिदान त्यांचा स्वाभिमान यांचे कठोर वास्तव पिढ्यांन पिढ्या जिवंत राहिले पाहिजे.

म्हणून हा चित्रपट करमुक्त करावा, तसेच शालेय विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात हा चित्रपट दाखवा ही कळकळीची विनंती शासनाला केली. यावेळी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष धिरज शेळके, शहरअध्यक्ष निलेश भैय्या पवार, प्रविण पवार, बजरंग पवार, अतीश थोरात, कालिदास गवळी, राम शिंदे ,हनुमंत पवार, सचिन गोडगे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button