श्री. शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयात भव्य राज्यस्तरीय डायरेक्ट हॉलीबॉल स्पर्धा संपन्न : इंडिया स्पोर्ट व्हॉलीबॉल संघ वैरागने मारली बाजी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी आयोजित कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त भव्य कर्मवीर राज्यस्तरीय डायरेक्ट हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन आज दिनांक 15 तसेच दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले होते.

स्पर्धेचे उद्घाटन मा. नंदन जगदाळे उपाध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी तसेच माननीय श्री पी. टी. पाटील साहेब सचिव, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक गुंड सर हे उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात या स्पर्धेच्या नियोजनाचा हेतू सांगितला. या स्पर्धेसाठी राज्यातून जवळपास 24 संघाने सहभाग नोंदविला. राज्यातील सोलापूर, धाराशिव, सांगली, लातूर अशा विविध जिल्ह्यातून संघाने सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा डे – नाईट स्वरूपात खेळवली.

सर्व सामने शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात खेळविण्यात आले. यामध्ये दोन मैदानाची व्यवस्था केलेली होती. एकूण 24 संघाचे जवळपास 23 सामने या मैदानावरती पार पडले व त्यातून पाच संघ विजेते म्हणून घोषित करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक विजेता संघ इंडिया स्पोर्ट व्हॉलीबॉल संघ वैराग, द्वितीय क्रमांक शिवरत्न हॉलीबॉल संघ शेळगाव आर, तृतीय क्रमांक मोरया हॉलीबॉल संघ काटी तुळजापूर, चौथा क्रमांक लोकमान्य हॉलीबॉल संघ मानकेश्वर, व पाचवा क्रमांक कर्मवीर हॉलीबॉल क्लब बार्शी यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, परिस स्पर्श हे पुस्तक तसेच ट्रॉमा युनिट ची माहिती पुस्तिका ही देण्यात आली. प्रथम पाच विजेत्या संघांना खालील व्यक्तींनी सहकार्य करून देणगी स्वरूपात हे बक्षीस दिले.

या बक्षिसांसाठी देणगीदार म्हणून प्रथम क्रमांकासाठी इंजिनिअर सुरज गायकवाड यांनी 11000/- रुपये, द्वितीय क्रमांकासाठी माननीय श्री अमोल ताकभाते साहेब बीडिओ तुळजापूर, यांनी 9000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी प्रा. हेमंत तुकाराम शिंदे यांनी 7000/- रुपये, चौथ्या क्रमांकासाठी माऊली पतसंस्था बार्शी यांनी 5000/- रुपये तसेच पाचव्या क्रमांकासाठी माननीय श्री राहुल आवटे यांनी 3000/- रुपये बक्षीस जाहीर केले होते.

सर्व विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव पी. टी. पाटील साहेब हे उपस्थित होते तसेच माननीय श्री जयकुमार शितोळे खजिनदार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी हे देखील उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतांमध्ये विजेत्या संघांना तसेच इतर सहभागी संघांचे अभिनंदन केले व असाच सहभाग कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांमध्ये नोंदवावा व अशा खेळीमेळीच्या वातावरणात अशा स्पर्धा पार पाडण्यात याव्या आणि सहकार्य करावे असे सांगितले. बक्षीस वितरणाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दीपक गुंड सर यांनी व्यक्त केले. तसेच आभार प्रा. साबळे सर व प्रा. धुमाळ सर यांनी मांडले. सूत्रसंचालन प्रा. जे. पी. गायकवाड सर यांनी केले.

या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ, बी वाय यादव साहेब, उपाध्यक्ष मा. श्री नंदन जगदाळे, सचिव माननीय पी. टी. पाटील साहेब, खजिनदार मा. जयकुमार शितोळे बापू तसेच सहसचिव मा. अरुण देबडवार व सर्व सदस्य यांनी मार्गदर्शन केले. शालेय समितीचे चेअरमन माननीय डॉ. जी. एम. पाटील सर व सर्व सदस्य यांनी देखील या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक गुंड यांनी योग्य असे नियोजन या स्पर्धेचे केले. त्यांना अध्यापक विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

स्पर्धेसाठी कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शीचे प्राचार्य डॉ. गोरे सर व शारीरिक शिक्षण विभागाचे डॉ. सुरेश लांडगे सर, डॉ. अनिल कांबळे सर यांनी देखील मैदान व्यवस्था करून सहकार्य केले. त्याचबरोबर बार्शीतील कर्मवीर व्हालीबॉल क्लब व चिंतामणी हॉलीबॉल क्लब बार्शी यांनी देखील विशेष सहकार्य या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी केले. बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या सर्व खेळाडूंसाठी अध्यापक विद्यालयामध्ये भोजन व्यवस्था करण्यात आली होती. सर्व सामने हे दिवस- रात्र या स्वरूपात प्रकाशझोतात खेळविण्यात आले. क्रीडा प्रेमींना ही एक विशेष पर्वणीच होती.

स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनेकांनी सहकार्य केले यामध्ये मा. अरविंद कोळी, माजी प्राचार्य डी. बी. पाटील,मा गणेश माने, मा. मनगिरे सर, मा. देशमाने सर. माननीय बरबडे सर या सर्वांनी या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या