खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रयत्नाने पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीतून ०५ गरजू रुग्णांना उपचारासाठी एकूण १०,००,०००/- (दहा लाख) रुपये अर्थसहाय्य मंजूर

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : लोकसभा मतदारसंघातील अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या रुग्णांना, गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना, दुर्धर आणि महागड्या आजाराच्या रुग्णांना उपचाराकरीता हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येतेे. त्यांना औषधोपचाराकरीता लाखो रुपये खर्च येत असल्यामुळे त्यांना उपचाराकरीता अनेक अडचणी निर्माण होत असतात. सदर रुग्णांच्या नातेवाईकांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांना भेटून निवेदन दिले होते.

पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीमधून औषधोपचाराकरीता आर्थिक मदत मिळण्याकरीता खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सतत पाठपूरावा करून

१) मास्टर रणवीर गायकवाड ३,००,०००/-
२) मायरा बेपारी ३,००,०००/-
३) फजल जहागीरदार ३,००,०००/-
४) धर्मराज हिरापुरे ५०,०००/-
५) महानंदा येलमेली ५०,०००/-

या ०५ रुग्णांना एकूण १०,००,०००/- (दहा लाख) रुपये अर्थसहाय्य मिळवून दिली.

महागड्या आजारांवरील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळाल्याने या कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. त्याबद्दल रुग्णांच्या नातेवाइकांनी खासदार प्रणिती ताई शिंदे यांचे आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या