क्राईमबार्शी

ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे चोरीचा प्रयत्न फसला, बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील घटना

B1न्युज मराठी नेटवर्क


बार्शी | गुरुवार 23/09/2021 रोजी बार्शी पोलीस स्टेशन हद्दीतील गुळपोळी ता. बार्शी जिल्हा सोलापूर गावात रात्री 2 वाजता चोर ( घरफोडी ) उद्देशाने खंडू हनुमंत काळे यांच्या घरी आले आहेत व घराचे लॉक तोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे कळताच गुळपोळी गावचे पोलीस पाटील बाळकृष्ण पिसे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600)सर्व गावाला माहिती कळवली, त्यामुळे तात्काळ गावकरी घटनास्थळी दाखल झाले, संपूर्ण गाव सतर्क झाल्याचे चोरांच्या लक्षात येताच चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आणि पुढील अनर्थ टळला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button