महाराष्ट्रमुंबई

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले येत्या सोमवार पासून 5 दिवसीय दुबई दौऱ्यावर

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई दि.14 : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले येत्या सोमवार दि .17 फेब्रुवारी पासून पाच दिवसांच्या दुबई दौऱ्यावर रवाना होणार आहेत.दुबई मध्ये वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ना.रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांची भारत देशाबाहेर ही आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असून त्यांचा दुबई आणि आखाती राष्ट्रांत ही मोठा चाहता वर्ग आहे. आखाती राष्ट्रांत भारतीय नागरिक त्यात मराठी जन ही मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत.

त्यामुळे दुबईतील मराठी उद्योजक ; कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकारी ; प्राध्यापक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था प्रतिनिधी; बुद्धिप्रामाण्यवादी महनीय व्यक्तींशी ना. रामदास आठवले चर्चा करणार आहेत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा मानवतेचा समतेचा विचार पुढे घेऊन जाण्याचे काम करणाऱ्या दुबईतील महनीय व्यक्तींशी ना.रामदास आठवले वैचारिक संवाद साधणार आहेत.

दुबईतील विविध संस्था आणि उद्योग जगतातील मान्यवरांच्या भेटी ते घेणार आहेत.वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड चा पुरस्कार सोहळ्या सोबत अन्य अनेक कार्यक्रमांना ना.रामदास आठवले उपस्थित राहून 5 दिवसांच्या दुबई दौऱ्याहून ते दि .21 फेब्रुवारी रोजी रात्री मुंबईत परतणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button