बार्शी तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस पदाची भरती प्रक्रिया सुरू , अर्ज करण्याची शेवटची मुदत २४ फेब्रुवारी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शी तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची प्रक्रिया १०/२/२०२५ रोजी पासून सुरू झाली असून बार्शी तालुक्यात वैराग शहरासह अंगणवाडी सेविकेच्या ३०जागा रिक्त असून अंगणवाडी मदतनीस च्या १६ जागा रिक्त असल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी रेश्मा पठाण यांनी दिली. अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी १२ बारावी पास पासून पदवी पदव्युत्तर डी एड/ बीएड/ असणाऱ्या महिला उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची मुदत २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत असून या शैक्षणिक पात्रता असणाऱ्या महिलांनी या पदासाठी अर्ज करावे रिक्त पदे असणाऱ्या गावांची नावे पुढीलप्रमाणे

अंगणवाडी सेविका रिक्त जागा –

उपळे ( दु) मळेगाव महागाव सासुरे लाडोळे आळजापुर आंबेगाव जवळगाव सुर्डी गुळपोळी सर्जापूर उक्कडगाव नारी/ नारीवाडी धोत्रे तावडी वाणेवाडी फफाळवाडी आगळगाव भोयरे चुंब साकत सौंदरे उपळाई ठोंगे कव्हे श्रीपत पिंपरी शेंद्री अलिपुर देवगाव धस पिंपळगाव बेलगाव

मदतनीस पदाच्या रिक्त जागा –

नांदणी बावी ( आ ) धामणगाव लाडोळे इर्ले वैराग राळेरास चिंचोली ढेंबरेवाडी चुंब कळबवाडी कोरफळे शिराळे श्रीपत पिंपरी धस पिंपळगाव मांडेगाव या गावातीलअंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या जागा रिक्त असून याचे प्रसिद्धीकरण त्या त्या भागातील गाव कामगार तलाठी व सार्वजनिक वाचनालयात करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या