36 वर्षांनंतर विद्यार्थी व शिक्षकांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा

मळेगावच्या मित्र विद्यालयात रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : कर्मवीर ना.मा गडसिंग गुरुजी,मित्र विद्यालय येथे सन 1989 बॅच मधील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला. कर्मवीर गडसिंग गुरूजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सेवानिवृत्त शिक्षक एन.एल गडसिंग यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक एल. वाय. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहसचिव हेमंत गडसिंग,सपोनी हेमंतकुमार काटकर,प्राचार्य विकास बोराडे प्रमुख पाहूणे यांची उपस्थिती लाभली. माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा मानाचा फेटा, ट्रॉफी, पुष्पगुच्छ, शाल भेट देऊन सत्कार करण्यात आला. एन.एल. गडसिंग एम. जे गडसिंग,एल वाय पाटील यांनी विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत कर्मवीर गडसिंग गुरूजी,मित्र विद्यालय व शिक्षकांविषयी असलेले प्रेम, आदर, आत्मीयता आयुष्यभर स्मरणात ठेवा असे विचार व्यक्त केले.
विद्यार्थी मनोगतातून गटविकास अधिकारी राजू कांबळे, प्रकाश शिंदे, राजेंद्र सातपुते, शांतीलाल घोलप यांनी मित्र विद्यालयात मिळालेली ज्ञानाची शिदोरी,आदर्श संस्कार,शिस्त सर्वांसाठी मार्गदर्शक व दिशादर्शक असतील असे मत यावेळी व्यक्त केले.माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयास प्रोजेक्टर व सरस्वती देवीची आकर्षक मूर्ती भेट दिली.
याप्रसंगी एम. जे गडसिंग,राजेंद्र कांबळे संचालक विलास मिरगणे, आर.के कांबळे, नवनाथ भालेराव, गंगूताई माळी, महारुद्र म्हमाणे, अजिनाथ जमदाडे, दत्तात्रय गिरी,कालिदास चापले, सुभाष आवारे, एन.डी मोरे, विलास गडसिंग, गौस शेख, दशरथ ननवरे, दत्तात्रय गवळी, भगवान काळे तसेच आजी माजी शिक्षक, विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र यादव, ज्योत्स्ना गडसिंग, गणेश गाभणे, पांडुरंग कुंभार, कलीम मुलानी शशिकला टोमपे, विद्या चव्हाण यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राजेंद्र सातपुते यांनी केले. आभार प्रकाश शिंदे यांनी मानले.