पुरस्कारमहाराष्ट्रसातारा

कराडमध्ये “यशवंत नगरी”चा दिमाखदार सोहळा…

B1न्यूज मराठी नेटवर्क

कराड : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले यांच्या “यशवंत नगरी” माध्यम समुहाचा २०वा वर्धापन दिन व यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दि.८ फेब्रुवारी रोजी कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती भवन येथे दिमाखात पार पडला. माजी खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आ. मनोजदादा घोरपडे, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेशबाबा भोसले,भाजपा प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ,कराड बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, डिजिटल मिडिया संघटनेचे संघटक तेजस राऊत, जिल्हा अध्यक्ष संतोष शिराळे आणि माझ्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.संपादक विकास भोसले, सौ. स्वाती भोसले आणि “टीम यशवंत नगरी” ने या सोहळ्याचे नियोजनपूर्वक परिश्रम घेतले. विकास भोसले आणि परिवाराचे मनापासून अभिनंदन !

आपला,
-राजा माने.
संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक.
-संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
-संस्थापक अध्यक्ष, प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबई.
-सदस्य, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button