पुरस्कारबार्शीमहाराष्ट्र

कै सुभाष काळे यांच्या स्मरणार्थ पुरस्कार जाहीर

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : कै सुभाष गणपत काळे यांच्या स्मरणार्थ कुलदैवत फार्म यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असलेल्या जाणीव फाउंडेशन, जय शिवराय प्रतिष्ठान, त्रिमूर्ती प्रतिष्ठान, ऍनिमल फ्रेंड्स आर्यन क्रीडा व संशोधन संस्था मंडळ, उद्योजक रवीआण्णा राऊत,सतीश देशपांडे, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, सचिन वायकुळे, संत मन्मथ शिरोमणी सेवा मंडळ, ओन्ली समाजसेवा संस्था, माधवराव देशमूख,यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती कुलदैवत फार्म चे अध्यक्ष राहुल काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बुधवार दि 12 रोजी सकाळी साडे दहा वाजता, कुलदैवत नागणे प्लॉट परंडा रोड बार्शी काळे निवासस्थानी शहर पोलीस स्टेशनचे पोनि बालाजी कुकडे, ग्रामीणचे पोनि दिलीप ढेरे,सह दुय्यम निंबधक ए एस बनसोडे,शिवाजी शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा अरुण देबडवार,माजी शिक्षणाधिकारी शिवदास नलावडे, तसेच जेष्ठ पत्रकार संतोष सूर्यवंशी यांच्या उपस्थितीमध्ये काळे यांच्या निवासस्थानी पुरस्कार वितरण होणार आहे व त्यानंतर लगेच महाप्रसाद कार्यक्रम चालू होईल तसेच त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता सामूहिक जागरण गोंधळ, तरी सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन राहुल काळे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button