उद्घाटनबार्शीमहाराष्ट्र

बार्शी आगारात नवीन १० “एसटी बसेस” चा ताफा सामील , मा. आ. राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते लोकार्पण

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : अनेक दिवसांपासून बार्शी आगारातील एस.टी आगारामधील एसटी बसेसची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची व प्रवाशांची गैरसोय होत होती. ती गैरसोय लक्षात घेऊन मा. आ. राजेंद्र राऊत यांनी मागणी करत सतत पाठपुरावा केला होता. राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळाकडून नवीन “१० एसटी बसेस” बार्शी एस. टी आगारात दाखल झाल्या आहेत.

आज रोजी मा. आ. राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते सदरील बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी एस.टी. महामंडळ बार्शी आगार व्यवस्थापक मधुरा जाधवर यांच्यासह चालक, वाहक, कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button